रंकिरेड्डी – शेट्टी जोडीला खेलरत्न तर मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार

 रंकिरेड्डी – शेट्टी जोडीला खेलरत्न तर मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाकडून आज आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. भारतीय क्रीडा विश्वातील सर्वांत प्रतिष्ठेचा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार हा सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटन जोडीला मिळाला आहे. तर क्रिकेट वर्ल्डकप 2023 मधील महत्त्वपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाज मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समारंभ हा राष्ट्रपती भवन येथे 9 जानेवारी 2024 ला होणार असून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारप्राप्त खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे.

शमी सह एकूण २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला असून ५ क्रीडा प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू
मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (अंध क्रिकेट), ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि मुरली श्रीशंकर (अॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग) , आर वैशाली (बुद्धिबळ), दिव्याकृती सिंग आणि अनुष अग्रवाला (अश्वस्वार), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक (हॉकी), सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वरी प्रताप सिंग तोमर (शूटिंग), अंतीम पंघल (कुस्ती), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), एशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), सुनील कुमार (कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग), पवन कुमार (कबड्डी). ), रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो खो).

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक
गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), शिवेंद्र सिंग (हॉकी).

SL/KA/SL

20 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *