खेडकर कुटुंबीय बेपत्ता, पोलीस पोहोचले बंगल्यावर
पुणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला असून खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणे आहे. खेडकर कुटुंब आणि त्यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली आहेत.
पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोन देखील स्वीच ऑफ असल्याचं पोलीसांच म्हणणे आहे. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचे गेट बंद असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचे चित्रीकरण केले आहे.
Khedkar family missing, police reached the bungalow
ML/ML/PGB
15 July 2024
आज पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक पुन्हा खेडकर यांच्या बंगल्यावर पोहचले, त्यांनी बंगल्याचे बंद दार उघडण्यासाठी आवाज देत विनंत्या केल्या, मात्र दरवाजा उघडण्यात आला नाही. दरम्यान खेडकर यांचे फोन आजही बंद असून , ठावठिकाणा लागत नाही असं पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.