खासदार गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले.

 खासदार गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले.

वाशिम, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम यवतमाळ च्या शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बँकेचे खाते आयकर चुकविल्याने गोठाविण्यात आले आहे. त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहेत.हा गवळी यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.

29 डिसेंबर रोजी आयकर विभागाने भावना गवळी यांना याबाबत नोटीस दिली होती. पाच तारखेला त्या संदर्भातील त्यांना त्यांचे म्हणणे मांडायचे होते मात्र त्या प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहिल्या नाहीत.
त्यांनी प्रतिनिधी पाठवून नोटीसला उत्तर दिलं होतं मात्र त्यावर इन्कम टॅक्स विभागाचे समाधान झालेले नाही.

8.26 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरण्यासाठी अखेर भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवण्यात आली आहेत. महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत 24 कोटी रुपयांची अफरातफर आणि त्यातून सात कोटी रुपये चोरी गेले अशी तक्रार 12 मे 2020 रोजी त्यांनी रिसोड पोलीस स्टेशनला दिली होती, मात्र या संदर्भातील इन्कम टॅक्स भरला नसल्याची बाब समोर आल्यानंतर त्यांना आयकर विभागाने ही नोटीस जारी केली होती.

ML/KA/PGB 7 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *