खापरोळ्या

 खापरोळ्या

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
१ वाटी तांदूळ
१.५ वाट्या उडीदडाळ
०.५ वाटी चणाडळ
१ चमचा मेथी .
चवीनुसार मीठ.
हळद.

नारळाचा रसः ( अंदाजे)
खवलेलं खोबरं
गूळ
वेलची/जायफळ पूड

२ वाट्या गावठी तांदूळ आणि अर्धी वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून ४ तास पाण्यात भिजत ठेवायची.

पोहे धुवून घ्यायचे. गूळ आणि खोबरं किसून ठेवायचं.

तांदूळ, डाळ, खोबरं, मेथी, पोहे, जीरे घालून खसखशीत वाटावं. वाटणात जास्त पाणी घालू नये. त्यात गूळ व मीठ घालून 7-8 तास (रात्रभर) हे मिश्रण आंबण्यास ठेवावं. इडलीच्या पिठाइतकं सरसरीत पीठ असावं.

दुसऱ्या दिवशी आंबलेलं पीठ एकदा ढवळून बिडाच्या तव्यावर तेल लावून मध्यम जाड आकाराच्या (उत्तप्याप्रमाणे) खापरोळ्या कराव्या.

या खापरोळ्या नारळाच्या रसात गूळ घालून
बनवलेल्या गुळवणी सोबत किंवा चहासोबत छान लागतात.

PGB/ML/PGB
5 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *