यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानी पोटी आतापर्यंत ७ हजार ५०० कोटींची मदत

 यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानी पोटी आतापर्यंत ७ हजार ५०० कोटींची मदत

मुंबई दि.१८ :- राज्यात सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यास शासन संवेदनशीलपणे काम करत आहे. बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत व्हावी म्हणून २३ जिल्ह्यातील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी तीन हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम केले जात आहे. मागील सात दिवसात सुमारे पाच हजार कोटीवर निधी वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले असून यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सुमारे सात हजार ५०० कोटीची मदत वितरणास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आपदग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळून त्यांचे जीवन अधिक सुकर होईल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर विभागातील तीन लाख ७६ हजार ९६८ शेतकऱ्यांच्या तीन लाख ४४ हजार ६२९.३४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ३४० कोटी ९० लाख ८ हजार निधीचा समावेश आहे.

नागपूर– एक लाख २ हजार ८५० शेतकऱ्यांच्या ८५ हजार ६४१.८८ हेक्टर क्षेत्रासाठी ११२ कोटी ३७ लाख रुपये.

चंद्रपूर– ९३ हजार ८९५ शेतकऱ्यांच्या ८१ हजार ७२६.८० हेक्टर क्षेत्रासाठी ६९ कोटी ४६ लाख ८६ हजार रुपये.

वर्धा– एक लाख ४९ हजार ५४६ शेतकऱ्यांच्या एक लाख ६७ हजार ४७६.९६ हेक्टर क्षेत्रासाठी १४२ कोटी ४० लाख ११ हजार रुपये.

भंडारा– १८ हजार ९५३ शेतकऱ्यांच्या ६ हजार ४२५.४१ हेक्टर क्षेत्रासाठी १० कोटी ४८ लाख ३६ हजार रुपये.

गोंदिया– सहा हजार ३९८ शेतकऱ्यांच्या दोन हजार ३०९.४६ हेक्टर क्षेत्रासाठी तीन कोटी ५० लाख २१ हजार रुपये.

गडचिरोली– पाच हजार ३२६ शेतकऱ्यांच्या एक हजार ४८.८३ हेक्टर क्षेत्रासाठी दोन कोटी ६७ लाख ५४ हजार रुपये.

अमरावती विभागातील चार लाख ७८ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या पाच लाख २६ हजार ३८१.३६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ४६३ कोटी ८ लाख ३० हजार निधीचा समावेश आहे.

अकोला– दोन लाख ९ हजार ४५४ शेतकऱ्यांच्या एक लाख ७२ हजार ८७५.१९ हेक्टर क्षेत्रासाठी १६२ कोटी ९५ लाख ३४ हजार रुपये.

अमरावती– ४८ हजार ७१ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ८८२.७४ हेक्टर क्षेत्रासाठी ३८ कोटी ४ लाख ५१ हजार रुपये.

यवतमाळ– दोन लाख २१ हजार ३८४ शेतकऱ्यांच्या तीन लाख ७ हजार ६२३.४३ हेक्टर क्षेत्रासाठी २६२ कोटी ८ लाख ४५ हजार रुपये.

पुणे विभागातील आठ लाख २५ हजार १८९ शेतकऱ्यांच्या सात लाख नऊ हजार २०९.१५ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ९५१ कोटी ६३ लाख ३७ हजार निधीचा समावेश आहे.

सातारा– तीन हजार ३८८ शेतकऱ्यांच्या एक हजार ५६२.६७ हेक्टर क्षेत्रासाठी दोन कोटी ४९ लाख ५ हजार रुपये.

सोलापूर– सहा लाख ७८ हजार ५९२ शेतकऱ्यांच्या पाच लाख ३८ हजार ८८९.५४ हेक्टर क्षेत्रासाठी ७७२ कोटी ३६ लाख ४५ हजार रुपये.

पुणे– ५२ हजार ७८९ शेतकऱ्यांच्या २१ हजार ९५१.९४ हेक्टर क्षेत्रासाठी ३४ कोटी ४२ लाख ८७ हजार रुपये.

सांगली – ९० हजार ४२० शेतकऱ्यांच्या एक लाख ४६ हजार ८०५ हेक्टर क्षेत्रासाठी १४२ कोटी ३५ लाख रुपये.

नाशिक विभागातील १५ लाख ७९ हजार २३९ शेतकऱ्यांच्या ११ लाख ५० हजार ३०१.७६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १४७४ कोटी ८४ लाख ९ हजार निधीचा समावेश आहे.

नाशिक – चार लाख नऊ हजार ४७४ शेतकऱ्यांच्या दोन लाख ८८ हजार ८०६ हेक्टर क्षेत्रासाठी ३१७ कोटी १५ लाख ७७ हजार रुपये.

धुळे – १६ हजार ३५७ शेतकऱ्यांच्या ११ हजार ५९४.१९ हेक्टर क्षेत्रासाठी १० कोटी २२ लाख ९७ हजार रुपये.

नंदुरबार– ९३१ शेतकऱ्यांच्या ४४५.०६ हेक्टर क्षेत्रासाठी ५३ लाख ९९ हजार रुपये.

जळगाव – तीन लाख २५ हजार ३५९ शेतकऱ्यांच्या दोन लाख ४७ हजार २६२.०१ हेक्टर क्षेत्रासाठी २९९ कोटी ९४ लाख ४७ हजार रुपये.

अहिल्यानगर – आठ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांच्या सहा लाख दोन हजार १९४.५० हेक्टर क्षेत्रासाठी ८४६ कोटी ९६ लाख ८९ हजार रुपये.

कोकण विभागातील एक लाख पाच हजार २३९ शेतकऱ्यांच्या २९ हजार २३३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी २८ कोटी १० लाख ६३ हजार निधीचा समावेश आहे.

ठाणे– ३५ हजार ६७६ शेतकऱ्यांच्या नऊ हजार ४८०.११ हेक्टर क्षेत्रासाठी आठ कोटी ३७ लाख ६५ हजार रुपये.

पालघर– ४९ हजार ५१७ शेतकऱ्यांच्या १३ हजार ७४४.२३ हेक्टर क्षेत्रासाठी १४ कोटी ४२ लाख ७ हजार रुपये.

रायगड– १८ हजार ५७८ शेतकऱ्यांच्या पाच हजार ८२९.४६ हेक्टर क्षेत्रासाठी पाच कोटी नऊ लाख ९ हजार रुपये.

रत्नागिरी– एक हजार १५३ शेतकऱ्यांच्या १०३.८८ हेक्टर क्षेत्रासाठी १३ लाख ५३ हजार रुपये.

सिंधुदुर्ग– ३१५ शेतकऱ्यांच्या ७५.४८ हेक्टर क्षेत्रासाठी आठ लाख २९ हजार रुपये.

ML/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *