खरीप पीक स्पर्धेत दुष्काळी शेतकरयांचा डंका….
सांगली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यस्तरीय आणि विभागीय पीक स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाजी मारली आहे.तब्बल 19 शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पीक स्पर्धेत जत आणि कवठेमहांकाळ,या दुष्काळी तालुक्यासह वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विजेतेपद पटकावले आहे.राज्य शासनाच्यावतीने राज्यस्तरीय आणि विभाग स्तरावर कृषी विभागाच्या माध्यमातून पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . यामध्ये जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरयांनी “एक गाव,एक वाण” अभियान अंतर्गत सहभागी होत. खरीप हंगामात पीकांचे भरघोस उत्पादन घेतले होते.उत्तम पीक उत्पादनाबाबत पार पडलेल्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेत जिल्ह्यातील 7 शेतकरयांना खरीप,बाजरी,मका,भुईमूग आणि सोयाबीन पीक सरासरी उत्पादन गटात प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे,तर कोल्हापूर विभागात पार पडलेल्या खरीप पीक स्पर्धेत तब्बल 12 शेतकऱ्यांना विजेतेपद पटकावले आहे,ज्यामध्ये उडीद,मका,मूग आणि बाजरी पिक उत्पादन गटात बाजी मारली आहे. 19 विजेत्या शेतकऱ्यां पैकी दुष्काळी कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील तब्बल 16 शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेत विजेतेपद पटकावले आहे.
ML/KA/PGB 17 May 2023