खारघरमध्ये अभिनय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

 खारघरमध्ये अभिनय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

पनवेल, दि २५
पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसांचे अभिनय प्रशिक्षण शिबीर खारघर येथे आयोजित करण्यात आले आहे. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे 30 जून पासून या शिबिराची सुरुवात होणार आहे. या शिबिरामध्ये नाट्य व सिनेक्षेत्रातील दिग्गज मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
पनवेल महापालिकाक्षेत्रामधील नाट्यकलावंतांना अभिनयासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांचा विकास होण्यासाठी योग्य प्रशिक्षण मिळावे याकरिता महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी महानगरपालिकेमार्फत पुढाकार घेऊन आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेच्या सहकार्यातून सर्वांसाठी विनामूल्य असे हे अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.
शिबिराच्या वेळा आणि उद्घाटन
शिबिरासाठी खारघर भागातीलरंगकर्मींनी मोठा प्रतिसाद दिला आहे.30 जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत या शिबीराचे उद्घाटन होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मोठ्या प्रतिसादामुळे सकाळी 9 ते 12 दुपारी 1ते 4 आणि सायंकाळी 5 ते 8 अशा तीन सत्रात शिबिर होणार आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील नाट्य कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळावे व त्यांमधून पनवेलचे नाव राज्यात सर्वत्र पोहचावे याकरिता नाट्यपरिषद विविध उपक्रम सातत्याने राबवित असते. पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन गटात हे अभिनय शिबीर घेण्यात येणार आहे. यामध्ये पहिला गट वय वर्षे 8 ते 16 व दुसरा गट 16 ते 60 वया पर्यंत आहे. सकाळी व संध्याकाळी अशा दोन टप्प्यात आठ दिवस हे अभिनय शिबीर हेाणार आहे. शिबिरासाठी प्रत्येक गटामध्ये 30 /30 प्रशिक्षणार्थी आहेत.
संपर्क
शिबीरात सहभागी होण्यासाठी संबंधितांनी पुढील क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क करावा.
1.शामनाथ पुंडे- प्रमुख कार्यवाह- नाट्य परिषद पनवेल शाखा.
मो.नं : 9821758147

  1. सौ स्मिता गांधी
    मोबा.नं. 9323489693
    3.सौ. वर्षा कुलकर्णी – जनसंपर्क अधिकारी पनवेल महानगरपालिका.
    मोनं. 7715815127
    या अभिनय शिबीराचा समारोपप्रसंगी 7 जुलैला मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. सर्व शिबीरांर्थींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
    पनवेलमधील नाट्यकलावंतांना अभिनयाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळावे याकरिता अशा प्रकारचे शिबीर घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन आखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेच्या सहकार्यातून हे अभिनय प्रशिक्षण आयोजित केले आहे. पनवेलमधील अभिनय प्रशिक्षणानंतर याच पध्दतीने खारघरमध्येही अभिनय प्रशिक्षण घेण्यात येणार असल्याचे अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले.

KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *