खारघरमध्ये एसएफए – एटीपी अकॅडमीकडून पालकांची फसवणूक; चौकशीची मागणी
मुंबई, दि २४:
खारघर परिसरात एसएफए – एटीपी अकॅडमी
पायलट प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळण्याचा आणि त्यानंतर त्यांना मानसिक त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी दुबईत बसून भारतात हा व्यवसाय चालवत असून या प्रकरणात अकॅडमीचे संचालक पंकज अनिल कृष्णन यांनी अंदाजे १० ते १५ पालकांची फसवणूक केल्याचा आरोप आरोप दलित पँथरचे पक्षप्रमुख डॉ.स्वप्नील ढसाळ व राष्ट्रीय अध्यक्ष संगीता ढसाळ यांनी सीएसटी येथील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत केला.
खारघर परिसरात एसएफए – एटीपी अकॅडमीमार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व करिअरच्या संधींचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात सांगितलेल्या सुविधा व पूर्ण प्रशिक्षण न देता पालकांची आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात आल्याचे डॉ.ढसाळ यांनी सांगितले.या प्रकरणात आतापर्यंत किमान पाच विद्यार्थ्यांच्या पालकांनी औपचारिक तक्रार नोंदविण्यासाठी पुढाकार घेतला असून, आपल्या मुलांच्या भवितव्याशी खेळ झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.KK/ML/MS