खाकरा भेळ
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
खाकरे – प्लेन किंवा फ्लेवर्ड.
तेल, मोहरी, जिरं, हळद, हिंग, हिरवी मिरची, कढीपत्ता, किसलेले आले, भाजलेले दाणे, लिंबू, सैंधव
कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, कोचवलेली काकडी
न वापरलेले पण वापरू शकाल अश्या वस्तू – किसलेले गाजर, किसलेला कोबी, सॅलडची पाने, मक्याचे दाणे, संत्र्याच्या फोडींचे तुकडे, पुदिन्याची पाने, स्प्राऊटस, उकडलेला बटाटा, सांडग्याची मिरची वगैरे
फोडणी: तेल-तापले-मोहरी-जिरे-तडतड-हळद-हिंग-हिरवी मिरची-किसलेले आले-कढीपत्ता… जरा खमंग परतून घेणे.
खाकरे दमट झाले असतील तर ते फोडणीवर घाला. नसतील तर फोडणी खाकर्यांवर ओता.
भाजलेले दाणे घाला. मिक्स करून घ्या.
परतलेल्या चुर्यामधे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर मिक्स करून मग वरून चवीप्रमाणे सैंधव घाला, वरून लिंबू पिळा आणि लगेच खा.
Khakra sheep
ML/ML/PGB
15 July 2024