कंटेनर मध्ये केली केशराची शेती

 कंटेनर मध्ये केली केशराची शेती

पुणे, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यात व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता असणाऱ्या शैलेश मोडक यांनी चक्क कंटेनरमध्ये केशराची लागवड सुरू केली आहे आणि त्याला यश ही आले आहे.

मी एक वेळची गुंतवणूक म्हणून १० लाख रुपये गुंतवले असे मोडक यांनी सांगितले. केशर शेतीसाठी मी काश्मीरमधून बियाणे आणले, एरोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मी फक्त १६० चौरस फूट इतक्या कंटेनरच्या क्षेत्रात केशर पिकवले असेही त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही शिपिंग कंटेनरमध्ये केशरची लागवड करत आहोत. येथे आम्ही हायड्रोपोनिकचे तंत्र वापरले आहे , हे तंत्र म्हणजेच मातीशिवाय शेती करणे आहे. आम्ही प्रथम हिरव्या भाज्या आणि स्ट्रॉबेरीचे उत्पादन केले, जिथे आम्हाला यश मिळाले, त्यानंतर आम्ही केशरची लागवड सुरू केली असे शैलेश मोडक यांनी सांगितले.

ML/KA/PGB

17 Dec 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *