मद्य विक्री धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांची होणार चौकशी

 मद्य विक्री धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवालांची होणार चौकशी

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली सरकारने मद्य विक्री धोरणात घेतलेल्या निर्णयात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आधीच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. अरविंद केजरीवाल यांची १६ एप्रिलला चौकशी केली जाणार आहे.

सीबीआय समन्स आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी ट्वीट करून टीका केली आहे. अत्याचाराचा अंत नक्कीच होणार असल्याचं ट्वीट करत भाजपावर टीका केली आहे. मद्य विक्री धोरण प्रकरणी २६ फेब्रुवारीला मनिष सिसोदियांना अटक झाली आहे. त्यानंतर आप आणि भाजपा यांच्यात आरोपांच्या फैरी झडत आहेत.

२०२०-२१ मध्ये दिल्लीतल्या मद्य धोरणात दिल्ली सरकारने बदल केला होता. काही ठराविक कंत्राटदारांनाच त्यात फायदा मिळवून दिल्याचा आरोप आहे. संबंधित योग्य त्या विभागाच्या संमती न घेताच लायसन्स फीमध्ये सवलत दिल्याचाही आरोप आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक देणारे निर्णय पक्षपातीपणे घेतल्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर आहे. या मद्य विक्री धोरणातील घोटाळ्याचा आरोप करत मनिष सिसोदियांना अटक करण्यात आली आहे.

SL/KA/SL

15 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *