केजरीवाल यांना न्यायालयाने सुनावली 6 दिवसांची ईडी कोठडी

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कालरात्री उशिरा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केली आहे. दरम्यान आज केजरीवाल यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने केजरीवालांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टाने कोर्टाने केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.ईडीच्या टीमने आज अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र त्यांनी हा अर्ज मागे घेतला आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केजरीवाल यांच्या अटकेवर आम आदमी पक्षाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील, असे आपने म्हटले आहे. गरज पडली तर तुरुंगातून सरकार चालवणार. मात्र, भाजपने नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते आज देशभरात निदर्शने करत आहेत. दिल्लीतील उत्पादन शुल्क प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जामिनासाठी संबंधित कनिष्ठ न्यायालयात दाद मागा, असे निर्देश न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश एम. एम. सुंदरेश आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान दिले.
ईडीने या प्रकरणी आतापर्यंत 6 आरोपपत्रे दाखल केली असून 128 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी ईडीने जारी केलेले नऊ समन्स केजरीवाल यांनी टाळले होते. यापैकी गुरुवार 21 मार्च रोजी नवीन समन्स जारी करण्यात आला. त्यांनी हे समन्स ‘बेकायदेशीर’ असल्याचे म्हटले आहे.
यापूर्वी 15 मार्च रोजी, ईडीने भारत राष्ट्र समिती (BRS) नेते आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या मुलीला दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग आरोपांच्या चौकशीच्या संदर्भात अटक केली होती. के. कविता यांना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. जामिनासाठी संबंधित कनिष्ठ न्यायालयात दाद मागा, असे निर्देश न्यायाधीश संजीव खन्ना, न्यायाधीश एम. एम. सुंदरेश आणि न्यायाधीश बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान दिले.
SL/ML/SL
22 March 2024