मद्य घोटाळा प्रकरणी अखेर अरविंद केजरीवाल यांना झाली अटक

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर आता निवडणूकासाठी सज्ज होत असलेल्या आप पक्षाला आज ED ने जोरदार झटका दिला आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक आज संध्याकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचलं. अखेर रात्री ९ वाजताच्या दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई केली. याच दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह सध्या तुरुंगात आहेत. दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून ईडीनं केजरीवाल यांची चौकशी सुरू केली होती.
दिल्ली सरकारच्या दारू धोरण अमलबजावणी प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत 9 समन्स पाठविले आहेत. मात्र, त्यापैकी एकही समन्सला केजरीवाल यांनी उत्तर दिलेले नाही. ईडीने पाठविलेली सर्व समन्स बेकायदेशीर आहेत असे सांगून त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले होते. तर, दुसरीकडे केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांनी चौकशी दरम्यान अटक करू नये म्हणून न्यायालयाकडे संरक्षण मागितले. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेतून दिलासा देण्यास नकार दिला आहे. या निर्णयानंतर ईडीची एक टीम मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झाली.
ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी केजरीवालांना अनेकदा समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, त्यांनी हजर राहणं टाळलं. ईडी राजकीय हेतूनं समन्स पाठवत असून मला अटक करण्याचा त्यांचा इरादा आहे, असा आरोप केजरीवालांनी केला होता. दंडात्मक कारवाईपासून संरक्षण मिळावं या केजरीवालांच्या मागणीला उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर ईडी झाली असून चौकशीसाठी एक पथक केजरीवालांच्या घरी पोहोचलं आहे. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे.
SL/ML/SL
21 March 2024