केजरीवालांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

नवी दिल्ली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीसाठी मोर्चो बांधणी करणाऱ्या आम आदमी पक्षाला या वर्षीची निवडणूक कठीण जाणार असेच दिसत आहे. कारण विविध पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आपचे संस्थापक जेलची हवा खात आहेत. आज त्यांच्या कोठडीत अजून १५ दिवसांची वाढ झाली आहे.
दिल्ली मद्य विक्री धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी संपली. त्यामुळे केजरीवाल यांना पुन्हा राऊज एव्हीन्यू कोर्टाच्या पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. आजच्या सुनावणीवेळी अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊस एव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश (पीसी ॲक्ट) कावेरी बावेजा यांनी हे निर्देश दिले आहेत.
मद्य विक्री धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची २८ मार्चला चार दिवसांची ईडी कोठडी वाढवली होती. केजरीवाल यांना २१ मार्चला अटक केली होती. त्यानंतर केजरीवाल यांना ईडीने २२ मार्चला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने केजरीवाल यांना सहा दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठवलं होतं. आजच्या सुनावणीवेळी अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
SL/ML/SL
1 April 2024