SC कडून केजरीवालांना अंतरिम जामिन मंजूर, मात्र तुरुंगातून सुटका नाही

 SC कडून केजरीवालांना अंतरिम जामिन मंजूर, मात्र तुरुंगातून सुटका नाही

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात तिहार जेलमध्ये अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यामुळे केजरीवाल यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही त्यांची तुरुंगातून सुटका होणार नाही कारण केजरीवाल यांना हा अंतरिम जामीन ईडीने अटक केलेल्या प्रकरणात दिला आहे. काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना सध्या तरी तुरुंगातच राहावं लागणार आहे.

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून २१ मे रोजी अटक करण्यात आली होती. ईडीकडून अटकेच्या कारवाई आधी अरविंद केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावले होते. मात्र, केजरीवाल चौकशीसाठी हजर झाले नव्हते. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.

अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या याचिकेवर आज न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी केजरिवाल यांना जामीन मंजूर करत हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचे आदेश दिले. सुनावणी होईपर्यंत केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, सध्या ते सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांना सध्या तरी तुरुंगातच राहावं लागणार आहे.

SL/ML/SL

12 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *