केजरीवाल सरकार दिल्लीत सर्वांना देणार मोफत ‘वीज’

 केजरीवाल सरकार दिल्लीत सर्वांना देणार मोफत ‘वीज’

FILE- Arvind Kejriwal

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीकरांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल सरकारने सर्वसामान्यांसाठी नवे धोरण आणले असून त्याअंतर्गत आता दिल्लीत सर्वांना मोफत वीज मिळणार आहे.केजरीवाल सरकारने नवीन सौर ऊर्जा धोरण आणि सोलर धोरण 2024 आणले आहे. यामुळे दिल्लीतील लोकांवरील वीज वीजबिलाचा बोजा कमी होणार आहे.

केजरीवाल म्हणाले, “दिल्ली सरकारने नवीन सौर ऊर्जा धोरण आणि सौर धोरण 2024 जारी केले आहे. आतापर्यंत 2016 चे धोरण लागू होते, ते देशातील सर्वात प्रगतीशील धोरण होते.”

ते पुढे म्हणाले की, ”दिल्लीत 200 युनिटपर्यंत वीज मोफत आहे तसेच 400 युनिटपर्यंत वीज बिल निम्मे आणि त्यावरी बिल आकारले जाते. नवीन सौर धोरणांतर्गत, जे लोक त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवतात, अशा लोकांनी कितीही युनिट वीज वापरली तरीही त्यांना शून्य वीज बिल असेल. याद्वारे तुम्ही दरमहा 700-900 रुपये कमवू शकता.”

केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली सौर धोरणांतर्गत, पुढील 3 वर्षांत 500 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या सरकारी इमारतींवर सौर पॅनेल बसवणे बंधनकारक असेल. दरम्यान, दिल्ली सौर धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

नवीन सौर धोरणांतर्गत दिल्लीतील जे लोक आपल्या छतावर सौर पॅनेल लावतात त्यांचे वीज बिल शून्य होईल. नवीन सौर धोरणाची माहिती शेअर करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, यामुळे दरमहा 700-900 रुपये कमावण्याची संधीही मिळू शकते.

SL/KA/SL

29 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *