निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला
बुलडाणा, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे पळाविण्यात आले असा गंभीर आरोप शिवसेना ( ऊबाठा ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पश्चिम विदर्भातील पहिला शेतकरी मेळावा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे घेण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते .
यावेळी व्यासपिठावर विधानरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव खा. विनायक राऊत ,खा. अरविद सावंत , डॉ निलम गोऱ्हे उपस्थित होते.Keeping the elections in sight, industries from Maharashtra to Gujarat
ठाकरे पुढे म्हणाले की कर्नाटकच्या निवडणुका आहेत तेव्हा राज्यातील सरकार सोलापूर, पंढरपूर, अक्कलकोट हे कर्नाटकामध्ये विलीन करतील का असा प्रति प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवण्याचं काम राज्यातील सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला .
महाराष्ट्रातील खोके सरकार मातीत गाडण्यासाठी धडा शिकवण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊच्या पावन भूमीने मी माझ्या दौऱ्याला सुरुवात केली आहे , या सरकारला मातीत गाडल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला .
आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, तुम्ही शेतकऱ्यांचे वीज माफ करणारा आहात का असा सवाल उपस्थित करून उद्यापासून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कर्जमाफी चे पैसे मिळवून देण्यासाठी व हमीभाव मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे निर्देश यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.
ML/KA/PGB
26 Nov .2022