क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

 क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे नवी मुंबईसाठी पुनर्विकास प्रदर्शनाचे आयोजन

*नवी मुंबई दि २० :– नवी मुंबई आणि रायगड भागातील गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पहिल्याच उपक्रमात चाळीस वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना, क्रेडाई एमसीएचआय युथतर्फे *सिडको Exhibition सेंटर रविवार, २९ जून २०२५ रोजी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00* वाजेपर्यंत मेगा पुनर्विकास प्रदर्शन योजले आहे.

आज नवी मुंबईतील हॉटेल ताज विवांता येथे रिअल इस्टेट उद्योगातील वरिष्ठ नेते, क्रेडाई एमसीएचआय युथचे पदाधिकारी आणि माध्यमांच्या उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या प्रदर्शनात नवी मुंबईतील तीस आघाडीचे विकासक एकत्र येणार आहेत. हे विकासक आपला पुनर्विकासातील अनुभव आणि प्रकल्प ऑफर प्रदर्शनाच्या माध्यमातून सादर करणार आहेत. पुनर्विकासाचा सक्रियपणे विचार करणाऱ्या नवी मुंबई आणि रायगडमधील ७५० हून अधिक गृहनिर्माण संस्थांनी या पुनर्विकास प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी केलेली आहे.

प्रदर्शनाचा उद्देश एक पारदर्शक, माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्यासपीठ तयार करणे आहे. यातून गृहनिर्माण संस्था आणि विकासक यांचा थेट संवाद होईल. परस्पर चर्चेतून पुनर्विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या जातील. या उपक्रमामुळे या परिसरातील महत्त्वपूर्ण व्यावसायिक संधी समोर येतील. हे व्यासपीठ नवी मुंबईच्या गृहनिर्माणाच्या पुनरुज्जीवनासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल.

प्रदर्शनाचा मुख्य उद्देश:-

• नवी मुंबईतील आघाडीच्या तीस (३०) प्रतिष्ठित विकासकांचा सहभाग
• ७५० हून अधिक गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत आणि प्रदर्शनात उपस्थित राहणार.
• सोसायटी प्रतिनिधी आणि विकासकांमध्ये वैयक्तिक संवाद
• पुनर्विकास प्रक्रिया, कायदेशीर बाबी आणि मंजुरी यावर थेट मार्गदर्शन
• एमएमआरडीए, एनएमएमसी, पीएमसी आणि सिडको यांचेकडून भक्कम समर्थन आणि मान्यता, ज्यामुळे शहर विकासाच्या दृष्टिकोनाशी पुरक

पत्रकार परिषदेत बोलताना, क्रेडाई एमसीएचआय युथचे अध्यक्ष आणि अनंत बिल्डर्सचे एमडी जितेश अग्रवाल म्हणाले, “हे प्रदर्शन केवळ पुनर्विकासाबद्दल नाही; ते नवी मुंबईच्या भविष्याला आकार देण्याबद्दल आहे. आम्ही एक व्यासपीठ प्रदान करत आहोत जे गृहनिर्माण संस्थांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास आणि योग्य विकासकांशी जोडण्यास सक्षम करते. ही सर्वांसाठी – सोसायटी, विकासक आणि एकूणच शहरासाठी परस्पर पुरक ठरणार आहे.

क्रेडाई एमसीएचआय युथचे तत्कालीन अध्यक्ष आणि हावरे प्रॉपर्टीजचे एमडी आणि सीईओ अमित हावरे पुढे म्हणाले, “या उपक्रमाद्वारे, नवी मुंबईच्या विकासाला चालना देणाऱ्या विश्वास, पारदर्शकता आणि नवीन व्यवसाय संधी निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. पुनर्विकास हा केवळ एक व्यावसायिक उपक्रम नाही; लोकांना सुरक्षित, आधुनिक आणि अधिक शाश्वत घरे देणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे.”

नवी मुंबईच्या शहरी पायाभूत सुविधांच्या सुव्यवस्थित, समावेशक आणि प्रगतीशील पुनर्विकासात योगदान देण्यासाठी रिअल इस्टेट उद्योगातील युवा नेत्यांच्या सहयोगी प्रयत्नांचे हे प्रतीक आहे.

क्रेडाई एमसीएचआय युथ विषयी:

क्रेडाई एमसीएचआय युथ ही ४० वर्षांखालील तरुण रिअल इस्टेट डेव्हलपर्सची एक गतिमान संघटना आहे, जी नवी मुंबई आणि रायगड प्रदेशातील रिअल इस्टेट उद्योगाच्या सुधारणेसाठी आणि वाढीसाठी काम करते. या क्षेत्रात नावीन्य, पारदर्शकता आणि व्यावसायिकता आणण्याच्या ध्येयाने, युथ प्रभावी उद्योग उपक्रम राबविण्यात आघाडीवर आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *