सातपुड्याच्या पायथ्याशी साजरी झाली काठी राजवाडी होळी—

 सातपुड्याच्या पायथ्याशी साजरी झाली काठी राजवाडी होळी—

नंदुरबार, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी समाजासाठी होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या होळी पर्वाला सुरुवात झाली असून काल रात्री दुर्गम भागात असलेल्या काठी संस्थानच्या मानाची राजवाडी होळी महोत्सव साजरा करण्यात आला. या होळी साठी सुमारे तीनशे किलोमीटर प्रवास करुन होळीचा बांबू गुजराथ राज्यातून आणला गेला.

https://youtu.be/-O5uamWbpJU

आदिवासी पुजाऱ्याच्या हस्ते विधिवत त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले. या महोत्सवात परिसरातील शेकडो गावातील नवस असलेले शेकडो आदिवासी पारंपारिक बावा, बुध्या, गेर तसेच ढोल पथके सहभागी झाले होते. ढोल, टिमरी,पावा, बेरी आदी वाद्यांना असमंत दुमदुमले होते. भक्ति, भाव आणि हर्षोल्हासात महोत्सव साजरा करण्यात आला. पथकांनी रात्रभर होळीचा फेर धरला. पहाटे ६.३० वाजता होळी पेटविण्यात आली. Kathi Rajwadi Holi was celebrated at the foothills of Satpuda—

यावेळी भाव, भक्ती, उल्हास शिगेला पोहोचला होता. या होळीचा आनंद लुटण्यासाठी मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील पारंपरिक पथके मोठ्या संख्येने सहभागी होतात. जिल्हा प्रशासना तर्फे येथे सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या होत्या.

PGB/ML/PGB
25 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *