कस्तुरबा रुग्णालयातील डॉक्टरांचा मनसेने केला सन्मान

मुंबई, दि २
मुंबई महापालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालय येथे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी अनिल येवले यांनी डॉक्टर दिवसानिमित्त प्रत्येक डॉक्टरांना भेटवस्तू आणि रोपटे देऊन सन्मान केला. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टर देखील चांगले काम करत असतात. अनेक गरीब रुग्णांसाठी ते देवदूतासारखे काम करत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा देखील सत्कार करण्याचा आमचा उद्देश होता. तो या डॉक्टर डे निमित्त पूर्ण झाला यापुढे देखील आम्ही समाजात चांगले कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा तसेच शासनातील विविध ठिकाणी लोकांना सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आम्ही सत्कार करणार असल्याची माहिती मनसेचे अनिल येवले यांनी दिली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनि त्यांचे मनापासून आभार मानले. KK/ML/MS