UPSC परीक्षेत ठाण्याची कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली

 UPSC परीक्षेत ठाण्याची कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली

ठाणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संघ लोकसेवा आयोगाचा (UPSC) २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये ठाण्याची कश्मिरा संखे हीनं महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तर रिचा कुलकर्णी हीनं राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे ऑल इंडिया पहिल्या चार रँकमध्ये देखील मुलींनीच बाजी मारली आहे.

कश्मिरा संखे हीनं निकालानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “खूप काही अपेक्षा मी ठेवल्या नव्हत्या. पण आशा होती आणि सकारात्मकता ठेवली होती की यावेळी नक्कीच यश मिळवायचं आहे. पण जेव्हा निकाल लागला तेव्हा फिलिंग होत होतं की, चांगला रँक येईल. तरी देखील ही प्रोव्हिजनल लिस्ट आहे का रँकर लिस्ट आहे हे तपासून पाहिलं. पण ही रँकर लिस्ट असल्यानं त्यात माझा ऑल इंडिया २५ वा रँक आला” (Latest Marathi News)

लहानपणापासून युपीएससी करण्याचं माझं स्वप्न होतं. कारण किरण बेदींचा प्रभाव माझ्या आईवर होता त्यामुळं तिनं मला त्यांची पुस्तकं वाचायला दिली. तेव्हापासून मला वाटतं होतं की आपण युपीएससी करुयात. माझं शालेय शिक्षण आणि पदवी हे मुंबईतून झालं. डेन्टल सर्जरीमध्ये मी पदवी घेतली आहे. हे करताना मी लोकांच्या आरोग्यासाठी काम करत होते पण सिव्हिल सेवेत येऊन जास्त मोठ्या स्केलवर काम करता येईल, असं मला वाटलं त्यामुळं युपीएससी केली.

मानववंशशास्त्र हा विषय तीनं ऑप्शनचा विषय म्हणून घेतला होता. या तिसऱ्या प्रयत्नात ती युपीएससी पास झाली आहे. तिचा पहिलं प्राधान्य आयएएससाठी होतं तर दुसरं प्राधान्य आयएफएससाठी होतं. पण चांगली रँक आल्यानं आता आयएएस होण्याचं तीचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

SL/KA/SL

23 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *