काश्मीरमधील तुरतुक गाव – भारताचे शेवटचे गाव, सौंदर्य आणि शौर्याचा संगम

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :तुरतुक हे लडाखमध्ये स्थित भारताचे शेवटचे गाव आहे. नुब्रा व्हॅलीतील हे लहानसे गाव, श्योक नदीच्या काठावर वसले आहे. येथे पोहोचण्यासाठी खडतर पर्वतीय वाट पार करावी लागते, पण एकदा का येथे पोहोचलात की, तुम्हाला हिमालयाच्या कुशीत वसलेल्या स्वर्गासारख्या निसर्गाचा अनुभव मिळतो. येथील बर्फाच्छादित शिखरे, हिरवळ, अप्रतिम हिमनद्या आणि स्थानिक बाल्टी संस्कृती पर्यटकांना वेगळाच अनुभव देतात. गावकरी अत्यंत प्रेमळ असून पर्यटकांना स्थानिक खाद्यपदार्थ आणि संस्कृती अनुभवण्याची संधी मिळते. हे ठिकाण सध्या ऑफबीट डेस्टिनेशन म्हणून लोकप्रिय होत आहे.
ML/ML/PGB 5 एप्रिल 2025