मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी लेन सुरू…

रत्नागिरी, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : होळीनिमित्त कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यची दुसरी लेन सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी एकाच बोगदातून वाहतूक सुरु होती. मात्र होळी निमित्त महामार्गावर होणारी वाहनांची गर्दी पाहता दुसरी लेन तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या आदेशानुसार दुसरीही सुरू करण्यात आली आहे त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांना आता सुलभ प्रवास करणे शक्य होणार आहे.
ML/ML/ SL
13 March 2025