करवीर निवासिनीचे गाभारा झाले अखेर सुरू

 करवीर निवासिनीचे गाभारा झाले अखेर सुरू

कोल्हापूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आजपासून साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई भक्तांना देवीचं जवळून गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार असून आजपासून त्याची सुरुवात झाली. Karveer Niwasini’s gabhara has finally started

https://youtu.be/9hG4Fy4gzzU

कोरोना काळात बंद केलेले पितळी उंबऱ्याच्या आतून दर्शनाला परवानगी देण्यात आली असून पालकमंत्री
दीपक केसरकर यांनी ही घोषणा केली होती. गर्दीचे दिवस वगळता वर्षभर ही सुविधा सुरू राहणार आहे.

कोरोना संपल्यानंतरही आतून दर्शन सुरू झालं नव्हतं. तीव्र नाराजी व्यक्त करीत आतून गाभाऱ्यातून जवळून दर्शन सुरू करण्याची महालक्ष्मी भक्तांची मागणी होती.
पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात नुकतीच घोषणा केली होती. कोरोना काळात पितळी उंबऱ्याच्या आतून बंद केलेलं
अंबाबाई दर्शन आजपासून सुरू झालं. गर्दीचे दिवस वगळता भाविकांना अंबाबाईचे अधिक जवळून गाभाऱ्यातून दर्शन घेता येईल.

ML/KA/PGB
30 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *