कार्तिकी एकादशी ची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

 कार्तिकी एकादशी ची पूजा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते…

सोलापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचे वारकरी बबन घुगे यांनी सपत्निक केली. पहाटे अडीच वाजता शासकीय पूजेला सुरुवात झाली. यानंतर ७३ कोटी रुपयांच्या पंढरपूरच्या मंदिर विकास आराखड्याचे पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील , आरोग्य मंत्री तानाजी सावंत , कामगार मंत्री सुरेश खाडे आणि मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर उपस्थित होते. अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि विठ्ठल स्तुतीच्या अभंगाच्या गजरात विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यास सुरुवात झाली.

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात चार लाख भाविक दाखल झाले आहेत. टाळ मृदुंगात होणारा हरिनामाचा गजर, भगव्या पताका, सगळीकडे वारकरी भक्तांची रेलचेल अशा भक्तिमय वातावरणात सध्या पंढरपूर गजबजलेले आहे. एकादशी निमित्त पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

ML/KA/SL

23 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *