कर्नाटकने पाणी सोडून पुन्हा डिवचले…
सांगली, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क): जत तालुक्याच्या दुष्काळी भागात थेट पाणी सोडून कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे. कर्नाटक सरकारकडून जतच्या तिकोंडी भागात आज सायफन पद्धतीने पाणी सोडण्यात आले.
कर्नाटक भागातील तुरची बबलेश्वर पाणी योजना ओव्हरफ्लो करून दुष्काळी भागात कर्नाटकाने पाणी सोडले.आधी कर्नाटकमध्ये येण्याचे निमंत्रण देऊन , आता थेट दुष्काळी भागातल्या गावात पाणी सोडले.
एक दिवसात तिकोंडी येथील साठवण तलाव कर्नाटकच्या सोडलेल्या पाण्यामुळे ओव्हरफ्लो झाला.महाराष्ट्राकडून शेतीसाठी पाणी मिळण्याची अपेक्षा यामुळे अनेक दिवस लांबणीवर पडली.
ML/KA/SL
1 Dec. 2022