इडली बनवण्याच्या या पद्धतीवर कर्नाटक सरकारने घातली बंदी

 इडली बनवण्याच्या या पद्धतीवर कर्नाटक सरकारने घातली बंदी

बंगळुरु, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

इडली बनवण्याच्या एका विशिष्ट पद्धतीवर कर्नाटक सरकारनं बॅन लावला आहे.पारंपारिकरित्या, इडली बनवताना त्यांना वाफवण्यासाठी सुती कापडाचा वापर केला जात होता. पण आता अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सोयीसाठी प्लास्टिकच्या शीटचा वापर केला जात आहे. ही बाब कर्नाटक सरकारच्या आरोग्य विभागाच्या निदर्शनास आली.राज्यभरात 251 हॉटेल्सची तपासणी करण्यात आली, त्यापैकी 51 हॉटेल्समध्ये इडली वाफवण्यासाठी प्लास्टिक शीटचा वापर केल्याचे आढळून आले.

आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी ही बाब गांभीऱ्याने घेतली आहे. प्लास्टिक गरम केल्यावर त्यातून विषारी रसायने बाहेर पडतात आणि ती अन्नात मिसळतात, ज्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात.कर्नाटक सरकारने प्लास्टिकच्या शीटवर इडली शिजवण्यावर बंदी घातली आहे. आरोग्य विभागाने सर्व हॉटेल्सना प्लास्टिक शीटऐवजी स्टेनलेस स्टीलच्या प्लेट्स किंवा केळीच्या पानांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून लोकांचे आरोग्य सुरक्षित राहून ते चविष्ट आणि आरोग्यदायी इडलीचा आस्वाद घेऊ शकतील.

SL/ML/SL

2 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *