कर्नाळा बँक घोटाळा, विवेक पाटील यांच्या मालमत्तेचा लिलाव…..

 कर्नाळा बँक घोटाळा, विवेक पाटील यांच्या मालमत्तेचा लिलाव…..

पनवेल दि २५– रायगड जिल्ह्यात पनवेल, उरणमधील राजकारणाला वेगळी कलाटणी देणाऱ्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी माजी आमदार विवेक पाटील यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश ईडीच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.
पनवेलची प्रसिध्द कर्नाळा स्पोर्ट्स अकँडमी आणि खालापूर तालुक्यातील पोसरी येथील १०२ एकर जमिनीच्या लिलाव केलेल्या रक्कमेतून गैरव्यवहारातील रक्कम वसुल केली जाणार आहे.

चार वर्षांपासून अटकेत असलेल्या विवेक पाटील यांनीच ईडीला कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या जप्त मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा प्रस्ताव दिला होता. शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील अध्यक्ष असलेल्या बँकेत पाच वर्षांपूर्वी ५०० कोटीहून अधिक रक्कमेचा गैरव्यवहार झाला. याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह अनेक संचालकांवर गुन्हा दाखल झाला होता.

चार वर्षांपासून विवेक पाटील तुरूंगवास भोगत आहेत. सध्या हे प्रकरण इडीच्या पीएमएलए न्यायालयात आहे. अनेकवेळा प्रयत्न करूनही जामीन मिळत नसलेल्या विवेक पाटील यांनी ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या मालमत्ता लिलावात काढण्याचा प्रस्ताव न्यायालयाला दिला होता. त्यावर झालेल्या सुनावणीत ईडीने मालमत्तांच्या लिलावाचे आदेश काढले. या प्रकरणात सुमारे ३५ हजार ठेविदारांचे पैसे परत करण्यासाठी ३८० कोटी रूपयांची रक्कम डिपॉझिट इन्शुरन्स अँन्ड गॅरन्टी स्किममधून विमा कंपनीने दिले आहेत.

अद्यापही ठेवीदारांचे १७८ कोटी रूपये देणे बाकी आहे.

विमा कंपनीचे ३८० कोटी, उर्वरित ठेवीदारांचे १७८ कोटी आणि बँकेचा ताळेबंद कर्मचाऱ्याची थकबाकी, इनकम टॅक्सच्या रक्कमा आदी देणे संपविण्यासाठी पीएमएए कायद्यानुसार पनवेलची कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी आणि खालापूर तालुक्यातील पोसरी येथील १०२ एकर जमिन लिलावात काढली जाणार आहे.

ईडीने ताब्यात घेतलेल्या ट्रस्ट आणि पाटील यांच्या वैयक्तिक ७६ मालमत्तांपैकी २ मोठ्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश २२ जुलै रोजी विशेष न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी ईडीच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडेल. असे पनवेलचे नायब तहसिलदार संभाजी शेलार यांनी सांगितले. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *