अतिवृष्टीमुळे कपाशी चे प्रचंड नुकसान

वाशीम दि २५: वाशीम जिल्ह्यात झालेल्या अति मुसळधार पावसाने पिकांचं होत्याचं नव्हतं केलं असून कपाशीला या पावसाचा जबर फटका बसला आहे. सततच्या अति मुसळधार पावसानं कपाशीची वाढ खुंटली असून त्याला पात्या आणि बोन्ड कमी प्रमाणात लागली त्यामुळं शेतकऱ्यांचा या कपाशी मधून लावलेला खर्च ही निघणार नाही. आम्ही शेतकरी कायम दुसऱ्यांना उभं करतो आता आम्हाला उभं करावं अशी मागणी या कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.ML/ML/MS