कांतारा आणि महावतार नरसिम्हा ऑस्करच्या शर्यतीत दाखल
मुंबई, दि. 9 : प्रसिद्ध चित्रपट निर्मिती संस्था होम्बले फिल्म्सच्या दोन सुपरहिट चित्रपटांनी ऑस्कर 2026 च्या (Oscars 2026) ‘जनरल एन्ट्री’ लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा: चॅप्टर 1’ आणि ‘महावतार नरसिम्हा’ या चित्रपटांनी जागतिक स्तरावर भारताची मान उंचावली आहे. , अनुपम खेर यांचा चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’ आणि तमिळ चित्रपट ‘टूरिस्ट फॅमिली’ देखील या यादीत दाखल झाले आहेत. या श्रेणीत एकूण २०१ चित्रपटांमध्ये स्पर्धा आहे.
जनरल एन्ट्री लिस्टमध्ये स्थान मिळाल्यानंतर आता हे चित्रपट विविध महत्त्वाच्या पुरस्कार श्रेणींसाठी विचारात घेतले जातील. यामध्ये प्रामुख्याने: सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (ऋषभ शेट्टी आणि अश्विन कुमार), सर्वोत्कृष्ट पटकथा/लेखन, सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन आणि सिनेमॅटोग्राफी या श्रेणींमध्ये हे चित्रपट शॉर्टलिस्ट होणार का, याचा अंतिम निर्णय आता अकॅडमीतर्फे घेतला जाईल.
SL/ML/SL