मौजा- मुरखळा माल ता.चामोर्शीत “कलियुगाचा कंस मामा” या दंडारीचा भव्य उद्घाटन सोहळा

चामोर्शी, दि १५:
खास लोक आग्रस्तव मौजा मुरखळा माल (ता. चामोर्शी) यांच्या सौजन्याने आदिवासी महिला दंडार मंडळ वनग्राम वाकडी यांच्या वतीने आयोजित भव्य दंडारी प्रयोगाचा आज उत्साहपूर्ण माहोलात शुभारंभ संपन्न झाला.
या दंडारीचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
या दंडारीचे शीर्षक होते — “कलियुगाचा कंस मामा अर्थात व्यथा एका कुटुंबाची” — समाजातील वास्तवाला स्पर्श करणारी आणि विचार करायला भाग पाडणारी कलाकृती!
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, सरपंच तथा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हा महामंत्री रेवनाथ कुसराम,भाजपा युवा नेते नरेश अलसावार, निरज रामानुजवार, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर पोटे, संजय खेडेकर, राजू चुधरी, आत्माराम चौधरी, नंदाजी रायसिडाम, अरुण बुरे, माणिक बुरे, निंबाजी ठाकरे, मारोती पोटे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात गोरक्षणकर्ते( गुराखी) गोकुळ मेश्राम, परशुराम गुरुनुले, वारलु कुळसंगे, पंढरी संदोकर या गुराख्यांसह श्री गुरुदेव सेवा मंडळ व भजन मंडळाचे कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते म्हणाले — “कलेच्या माध्यमातून समाज जागृत करण्याचं हे अनोखं कार्य आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून लोप पावत चाललेली दंडार कला आज पुन्हा पाहायला मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे, आपल्या महिला भगिनींनी या कलेला जिवंत ठेवून समाजासमोर प्रभावी सादरीकरण सादर करत आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे.”
तसेच मा.खा.डॉ. नेते पुढे बोलत म्हणाले “मी दहा वर्षांच्या कार्यकाळात अनेक विकासाची कामे केली ज्यात रेल्वे, मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय, गोंडवाना विद्यापीठ, चिचडोह व कोटगल बँरेजेस, नँशनल हायवेची विविध विकास कामे केली. सर्व क्षेत्रात सातत्याने प्रयत्न केले आहेत.”असे प्रतिपादन मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी केली.
या कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला भगिनी, युवा कार्यकर्ते आणि दंडार श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS