सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटासाठी 8 वर्षांनंतर कंगना – माधवन शेअर करणार स्क्रीन
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
बॉलिवूडची क्विन म्हणुन ओळखली जाणारी कंगना राणौत ही सध्या तिच्या फ्लॉप चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी तिचा चंद्रमुखी 2 आणि त्यानंतर तेजस हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेला. त्यामुळे आता तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची चर्चा आहे. आता त्यातच कंगनाने तिच्या आगामी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे ज्याचे चेन्नईत शूटिंगही सुरू झाले आहे. Kangana – Madhavan will share the screen after 8 years for a psychological thriller film
कंगना रणौतने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. तिने पूजेचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
कंगनाने माधवनसोबतचा तिचा जुना फोटो शेअर करत ‘तो परत आला आहे’ असे म्हटले आहे. त्यामुळे या चित्रपटात त्यांची जोडी जमणार आहे अशी चर्चा सुरु आहे.
SL/ KA/ SL
18 Nov. 2023