काळाचौकी येथे झाले विविध कामाचे उद्घाटन
मुंबई, दि २३
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या खासदार निधीतून काळाचौकी शाखा क्र.२०४ मधील “तरुण उत्साही मंडळ मंगलमूर्ती, काळाचौकी येथील नविन समाज मंदिरचे उद्घाटन आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
गेला अनेक महिन्यापासून या ठिकाणी समाज मंदिर बांधण्याचे कामाची लोकांकडून मागणी होती त्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी विविध सामाजिक लोकोपयोगी कामाचे शुभारंभ केले असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी दिली.
आम्ही लोकांसोबत 24 तास संपर्कात असतो. त्यांच्या सुख दुःखात सोबत असतो तसेच त्याची जी काही कामे असतात ती प्रामुख्याने करत असतो त्यामुळे आम्हाला लोकांचा जनाधार असल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक अनिल कोकिळ यांनी दिली.
यावेळी शाखाप्रमुख किरण तावडे, महिला शाखा संघटक कांचनजी घाणेकर, शिवडी विधानसभा संघटक सौ. समीक्षा ताई परळकर तसेच इतर सर्व पदाधिकारी, महिला आघाडी व शिवसैनिक उपस्थित होते.KK/ML/MS