कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणू

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण रक्षणात कांदळवनांचा वाटा फार मोठा आहे. कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणू. तरीही त्यांना बिनकामाची वनस्पती ठरवून त्यांची जगभरात कत्तल केली जाते. जगभरातील ३५ टक्के कांदळवने गेल्या अर्धशतकात नष्ट झाली. त्याला काही नैसर्गिक आपत्ती कारणीभूत होत्या; मात्र बाकी विकासकामाचे बळी! ज्यांना हे जाणवले त्यांनी कांदळवनांचे रोपण पुन्हा सुरू केले.
नव्याने लावलेल्या वनस्पती नैसर्गिक वनस्पतींच्या तुलनेत पहिल्या दोन दशकांत मुळांद्वारे ७० टक्के, तर खोड, पानांद्वारे ६३ टक्के कार्बन शोषण करतात. नंतर त्यांची क्षमता घटते. तरीही जमिनीखाली ७३ टक्के आणि जमिनीवर ७१ टक्के कार्बन शोषण केले जातेच. नवी झाडे लावल्यावर जमिनीखालचा कार्बन पाच वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढला. सहा हजार ६०० चौरस किलोमीटर इतक्या भूभागावर कांदळवने लावणे हे केव्हाही शाश्वतच होय. अर्थात, या साऱ्या गोंधळापेक्षा आहेत ती कांदळवने जपणे जास्त प्रस्तुत ठरेल.
कार्बन शोषून घेणारी कांदळवने म्हणजे मंगलवनेच जणू
PGB/ML/PGB
31 July 2024