माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे निधन
पुणे दि ६ : माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश शामराव कलमाडी यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले, ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा , दोन विवाहित मुली तसेच परिवार आहे.
कलमाडी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नेते, माजी खासदार आणि ज्येष्ठ क्रीडा प्रशासक होते. सुरेश कलमाडी पुणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत लोकसभेत निवडून आले होते. केंद्र सरकारमध्ये त्यांच्याकडे रेल्वे खात्याच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार देखील होता. मात्र 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (Commonwealth Games) घोटाळ्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचारारोपांमुळे अटकेची कारवाई झाली होती.
ते पुणे लोकसभा मतदारसंघाचे अनेक वेळा खासदार राहिले आहेत. सुरेश शामराव कलमाडी अनेक वेळा लोकसभेचे सदस्य (खासदार) म्हणून पुणे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. सुरेश कलमाडी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष होते आणि 2010 च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन समितीचे अध्यक्ष होते. 2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचा सुरेश कलमाडी यांच्यावर आरोप होता, ज्यामुळे त्यांना अटकही झाली होती, परंतु खटला अद्याप सुरू झालेला नाही. सुरेश कलमाडी भारतीय वायुसेनेचे माजी वैमानिक होते आणि नंतर राजकारणात सक्रिय झाले होते. कलमाडी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.
ML/ML/MS