‘श्री श्री श्यामा काली पूजा उत्सव 2025 ’चे 20,21 व 22 ऑक्टोबर दरम्यान आयोजन

पुणे, दि १३: श्री श्री श्यामा काली पूजा, पुणे शहरच्या वतीने ‘सार्वजनिक काली पूजा उत्सव 2025’चे आयोजन येत्या 20,21 व 22 ऑक्टोबर 2025 ,दरम्यान R.C.M. गुजराती स्कूल, फडके हौद चौक, पुणे येथे करण्यात आले आहे. आहे. यावर्षी या प्रतिष्ठित उत्सवाला 25 वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला विनोद संतरा- खजिनदार ,अमर माझी-उपसेक्रेटरी ,अनुप माईती – सदस्य , महादेव माझी – सदस्य ,पूनचंद्र दास- सदस्य,संकेत मजुमदार आणि इतर सभासद उपस्थित होते.
‘श्री श्री श्यामा काली पूजा उत्सव 2025’ बद्दल अधिक माहिती देताना सुब्रतो मजुमदार म्हणाले,मातृशक्तीचे प्रतीक असलेल्या देवी कालीच्या भक्तांचा अत्यंत भावनिक व श्रद्धेचा सोहळा असून यंदा तो रौप्यमहोत्सवी असल्याने आणखी भव्यदिव्य स्वरूपात पार पडणार आहे.
मुख्य पूजा सोमवार, 20 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9:40 वाजता ते मध्यरात्रीपर्यंत महापूजा स्वरूपात होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. यामध्ये सकाळी 10 ते 2 या वेळेत रक्तदान शिबिर, दुपारी 12 ते 3 या वेळेत प्रसाद वितरण, तसेच सायंकाळी 7 ते 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
कार्यक्रमाचा समारोप बुधवार, 22 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 7 या वेळेत मिरवणुकीने होणार आहे. या मिरवणुकीमध्ये पश्चिम बंगाल येथील पारंपारिक वाद्य ढाक प्रमुख आकर्षण असणार आहे, तसेच ढोल ताशा पथक मिरवणुकीत असणार आहे, पारंपारिक बंगाली वेशभूषा करून यामध्ये महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन R.C.M. गुजराती स्कूल, फडके हौद चौक, पुणे येथे करण्यात आल्याचे मजुमदार यांनी सांगितले.
कोलकाता मधून पुण्यात आलेल्या काम करणाऱ्या सुवर्ण कारागिरांनी या महोत्सवाची सुरुवात केली होती. पुण्यातील बंगाली समाजासह विविध धर्मीय व सांस्कृतिक घटकांना एकत्र आणणारा हा उत्सव गेल्या पंचवीस वर्षांपासून सामाजिक ऐक्य, भक्ती आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत आला आहे. या वर्षीच्या वर्धापन दिनानिमित्त पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन समिती तर्फे करण्यात आले आहे.KK/ML/MS