काळाचौकी येथील मालवणी जत्रेला उस्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि २८
शिवसेना शाखा क्रमांक 205 चे नगरसेवक दत्ता पोंगडे आणि शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांच्यावतीने काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदान येथे मालवणी जत्रा उत्सवाचे आयोजन केले होते. त्यास विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या जत्रोत्सवात विविध खाद्यसंस्कृती, पारंपारिक लोककला, सुस्वर भजन,मनोरंजन इत्यादी कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी झुंबड पहायला मिळाली. लहान मुलांसाठी या ठिकाणी विविध प्रकारचे पाळणे,ट्रेन , झोपाळे आणि किड्स लोणचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये
लहान वयाच्या मुलांन पासून ते जेष्ठ नागरिकांनी सहभाग घेऊन विविध आकर्षक पारितोषिक जिंकली. या यात्रेमध्ये डबलबारी भजन आणि गाण्यांनी रसिकांचे मने जिंकली.
विभागातील लाडक्या बहिणींकरता त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यातील बदल घडवून आणण्यासाठी
होम मिनिस्टर स्पर्धा राबवून
विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षीस आणि पैठणी
देऊन गौरवण्यात आले.
दहा दिवस या कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवसाला लकी ड्रॉ कुपनद्वारे मानाच्या पैठणी देऊन महिलांना एक विशेष आनंद मिळाला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला भेटवस्तू म्हणून ज्युसर देऊन सन्मानित करण्यात आले.
या मालवणी जत्रोत्सवात अनेक नेते मंडळी मान्यवर यांची आवर्जून हजेरी व शिवडी विधानसभेतील या जत्रोत्सवात सहपरिवार हजेरी लावतात. नागरिकांना आपल्या धकाधकीच्या जीवनातून एक छोटासा विरंगुळा मिळावा या दृष्टिकोनाने आम्ही मालवणी जत्रेचे आयोजन करत असतो. यापुढे देखील आम्ही मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि शैक्षणिक आणि क्रीडा विषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती आयोजक शिवसेनेचे नगरसेवक दत्ता भोंगळे आणि शाखाप्रमुख जयसिंग भोसले यांनी दिली.KK/ML/MS