ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचे निधन
पुणे दि १७ : ज्येष्ठ कवयित्री आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या आसावरी काकडे यांचे पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. काल १६ मार्च रोजी रात्री सुमारे १०.२० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संवेदनशील लेखनशैली, काव्यातील भावविश्व आणि सामाजिक जाणिवा यामुळे आसावरी काकडे यांना मराठी साहित्यविश्वात विशेष मानाचे स्थान मिळाले होते. त्यांच्या साहित्यिक योगदानाची दखल घेत त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) सकाळी १० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, साहित्यप्रेमी आणि मोठा वाचकवर्ग असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वातील एक संवेदनशील आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.ML/ML/MS