पाच वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार कैलास मानसरोवर यात्रा

नवी दिल्ली, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनच्या आडमुठेपणामुळे बंद झालेली हिंदू चे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेली कैलास मानसरोवर यात्रा यंदाच्या उन्हाळ्यात पुन्हा सुरू होणार आहे. जून 2020 मध्ये भारत आणि चीनमधील डोकलाम वादानंतर ही यात्रा थांबवण्यात आली होती. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांच्या दोन दिवसांच्या चर्चेनंतर ही यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दोन्ही देशांदरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला. कोविडपासून हे बंद होते.
या चर्चेसाठी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री बीजिंगला गेले होते. भारत आणि चीनच्या परराष्ट्र सचिव-उपपरराष्ट्र मंत्री यंत्रणेच्या अंतर्गत ही चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांची ऑक्टोबरमध्ये कझान येथे भेट झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी परस्पर संबंधांच्या स्थितीवर चर्चा केली आणि संबंध सुधारण्यासाठी काही पावले उचलण्याचे मान्य केले.
कैलास मानसरोवरचा बहुतांश भाग तिबेटमध्ये आहे. चीन तिबेटवर आपला हक्क सांगतो. कैलास पर्वतरांग काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. या भागात ल्हा चू आणि झोंग चू नावाच्या दोन ठिकाणांच्या मध्ये एक पर्वत आहे. येथे या पर्वताची दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखले जाते. या शिखराचा आकार विशाल शिवलिंगासारखा आहे. हे ठिकाण उत्तराखंडमधील लिपुलेखपासून अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर आहे. सध्या कैलास मानसरोवरचा मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी चीनची परवानगी आवश्यक आहे.
SL/ML/SL
28 Jan. 2025