कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यासाठी चीनने घातली अट

 कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यासाठी चीनने घातली अट

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनच्या कुरापतीमुळे बराच काळ स्थगिती झालेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार असताना चीनकडून परत एकदा कुरबुरी चालू झाल्या आहेत.भारत-चीन यांच्यात कैलास मानसरोवर यात्रा सुरू करण्यासंबंधी सहमती होऊनही अद्याप या यात्रेसाठी नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झालेली नाही. तिबेटच्या नागरी प्रांतामधील कैलास पर्वत आणि मानसरोवराच्या यात्रेसाठी सर्वात योग्य काळ हा जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचा असतो. परंतु यासाठी मार्च-एप्रिल दरम्यान यात्रेकरूंची नोंदणी सुरू होणे आवश्यक होते. परंतु चीनने अद्यापही यात्रा सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. कैलास यात्रा आणि भारत-चीन यांच्यात थेट विमानसेवा एकाच वेळी सुरू व्हावी, अशी अट चीनने घातली आहे.भारताने मे महिन्यात विमानसेवा सांकेतिक पद्धतीने सुरू केल्यास जून महिन्यात कैलास मानसरोवर यात्रा सुरू करता येऊ शकते, अशी चीनची इच्छा आहे.

दिल्ली, लखनऊ आणि कोलकात्याहून ल्हासा (तिबेट) विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परराष्ट्र सचिव पातळीवरही भेट,चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उभय देशांत थेट विमानसेवेत एअर इंडिया, एअर चायना, चायना सदर्न आदींच्या समावेशासाठी मोठे नेटवर्क सक्रिय करावे लागेल.

विमानसेवा सुरू झाल्यानंतर दरमहा सुमारे ५०० विमानांची ये-जा होईल. तसेच एक ते दीड लाख व्हिसा दोन्ही देशांकडून जारी केले जातील. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हिसा जारी करण्यासाठी मोठी यंत्रणा उभारावी लागणार आहे. गेल्या ५ वर्षांपासून ही सेवा ठप्प असल्याने यंत्रणाही कार्यान्वित नाही.

SL/ML/SL

12 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *