कास पुष्प पठाराच्या हंगामाचा शुभारंभ

सातारा दि ५– जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पठाराच्या पर्यटन हंगामाचा शुभारंभ झाला असून देशभरातील पर्यटक आता कास येथे येण्यास सुरुवात झाली आहे. निसर्गाने आपल्या हाताने इथे रंगांची मुक्त उधळण केली आहे. कास पठारावर सर्वत्र विविध फुलांच्या रंगछटा पसरल्या आहेत.

यामध्ये तेरडा, चवर, गेंद, सीतेची आसवे, नीलिमा, आभाळी, भारंगी यासह तुरळक प्रमाणात टोपली कारवी या फुलांचा बहर आला आहे. यंदाच्या हंगामासाठीही नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने पर्यटक येणे अपेक्षित असून स्वच्छ सुरक्षित व जबाबदार पर्यटनावर भर राहील, असा विश्वास साताऱ्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी व्यक्त केला.ML/ML/MS