दख्खनचा राजा श्रीजोतिबाची सोहम कमळ पुष्पात सालंकृत महापूजा
कोल्हापूर दि २४: आज अश्विन पक्ष तृतीया, शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस. दख्खनचा राजा म्हणून महाराष्ट्रात प्रसिध्द असलेल्या कोल्हापूरच्या श्रीजोतिबा देवाची सोहम कमळ पुष्पा मध्ये राजेशाही थाटात खडी अलंकारिक महापुजा आज बांधण्यात आली. जोतिबाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करत भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी गर्दी केली.
नवरात्रीच्या नऊ दिवस दररोज सकाळी श्रीजोतिबाची शाही पालखी मरगुबाई मंदिराच्या भेटीसाठी जाते. आज सकाळी नऊ वाजता घोडे, उंट यासह पालखी उत्साहात मरगुबाई मंदिराच्या भेटीसाठी निघाली होती. आजची पुजा ही देवाचे पुजारी प्रसन्ना भंडारी व त्यांच्या चमूने बांधली आहे. त्याबाबत ते म्हणाले.
श्रीजोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करीत आहेत. कर्नाटक, आँध्र प्रदेश व राज्यातील विविध जिल्ह्यातून भाविकांची गर्दी होत आहे. पार्किंग व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था यामध्ये स्थानिक प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे.ML/ML/MS