ज्योती गायकवाड यांचे अनोखे आंदोलन
 
					
    मुंबई दि २१– काँग्रेसच्या आमदार डॉ ज्योती एकनाथ गायकवाड यांनी आज विधानभवन परिसरात टी शर्ट घालून आंदोलन केले. अदानीला जमिनी देऊन, मुंबईकरांचा विश्वासघात करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
अदानीला १४ कोटी चौरस फूट, मुंबईकरांना विश्वासघात..!
जनतेचे नव्हे, अदानीचे सरकार
अदानी सरकार, जवाब दो!
टी शर्ट वर सरकारला विचारले चार प्रश्न
१) 40% सर्वेक्षणही झाले नाही, मग मास्टर प्लॅन तयार कसा?
२) मास्टर प्लॅनवर लोकांचा अभिप्राय नको?
३) अदानीला धारावीच्या सहापट जागा, धारावीकरांना बाहेरचा रस्ता – हा तर विनाश?
४) विरोध केला तर बेदखल करणार.. असा तुघलकी GR का?
असे सवाल त्यांनी यावेळी केले.
 
                             
                                     
                                    