मुंबई काँग्रेस पक्षातर्फे जल्लोष

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावप्रकरणात सुनावण्यात आलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थिगिती दिल्याने मुंबई काँग्रेस पक्षातर्फे ढोल ताशा च्या गजरात फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हजारों कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेस येथील राजीव गांधी भवन या ठिकाणी ढोल तासे वाजवून ,फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला.
मोदी आडनावाप्रकरणी मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना मार्च २०२३ मध्ये सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, गुजरात हायकोर्टाने ७ जुलै रोजी यावर सुनावणी घेत शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थिगिती दिल्याने मुंबई काँग्रेस पक्षातर्फे फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे हजारों कार्यकर्ते सहभागी झाले होते. Jubilation by Mumbai Congress Party
ML/KA/PGB
4 Aug 2023