मुंबई – गोवा महामार्गासाठी रायगडमधील पत्रकार पुन्हा रस्त्यावर

 मुंबई – गोवा महामार्गासाठी रायगडमधील पत्रकार पुन्हा रस्त्यावर

रायगड, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई – गोवा महामार्गासाठी रायगडमधील पत्रकार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहेत. 12 सप्टेंबर 23 रोजी कोलाड नाका येथे नेहमीप्रमाणे शांततेच्या मार्गानं आरती जागर आंदोलन होत आहे. एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होईल.

9 ऑगस्ट रोजी पत्रकारांनी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन केलं होतं. त्यानंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी 10 सप्टेंबर पर्यत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे आणि एक लेन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कामाचा वेग लक्षात घेता हे काम गणपतीपुर्वी पूर्ण होत नाही.. खड्डे भरण्याचे काम ज्या एजन्सीला दिले गेले होते ती एजन्सी बदलली जात आहे तर जी मशिनरी सिमेंटचे काम करीत होती ती नादुरूस्त झाल्यानं रस्त्याचं काम निर्धारित वेळेत पूर्ण होणं शक्य नाही असं दिसतं आहे.

रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाही तर गणेश भक्तांना प्रवास करणं शक्य होणार नाही. पेण – इंदापूर, लोणेरे – दासगाव या दरम्यान गाडी चालविणे अशक्य झालेले आहे.. असे असतानाही सरकार गांभीर्याने या विषयाकडे पहात नाही याचा निषेध करण्यासाठी 12 सप्टेंबर रोजी आरती जागर आणि खड्डयावरील गाण्याचा कलगीतुरा मुकाबला खड्ड्यात बसून केला जाणार आहे. या आंदोलनात पत्रकार आणि जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी केलं आहे.

ML/KA/SL

4 Sept 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *