मुंबई गोवा महामार्गावर पत्रकारांनी केले बोंबाबोंब आंदोलन….

 मुंबई गोवा महामार्गावर पत्रकारांनी केले बोंबाबोंब आंदोलन….

अलिबाग, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई गोवा महामार्गाच्या दूरवस्थेच्या निषेधार्थ रायगड प्रेस क्लब तर्फे आज झालेल्या आंदोलनादरम्यान रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज (अप्पा) खांबे यांनी नागोठणे येथील वाकण येथे मुंबई गोवा महामार्गावरील तीन फुट पाण्याने भरलेल्या खड्यांत डुबकी मारून शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला .

सरकारच्या विरोधात पत्रकारांनी बोंबाबोंब आंदोलन करून राजकारण्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यात गेला असून प्रशासनाला आणि स्थानिक आमदार, खासदारांना पुन्हा एकदा जाग यावी याकरिता रायगड प्रेस क्लब चे विश्वस्त एस एम देशमुख आणि रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचे हे बोंबाबोंब आंदोलन वाकण फाटा येथे करण्यात आले.Journalists carried out a bombing protest on the Mumbai Goa highway.

या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकार काय भूमिका घेतोय आणि येथील सर्व पक्ष नेतेमंडळी काय भूमिका घेत आहे हे बघणं महत्त्वाचं आहे.
यावेळी रायगड जिल्ह्यातील अनेक पत्रकार या बोंबाबोंब आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा संयुक्तपणे निषेध केला.

ML/KA/PGB
9 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *