भाजपाशी हातमिळवणी, काँग्रेस नेता पदच्युत
चंद्रपूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपशी केलेली हात मिळवणी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्षांना भोवली, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यमुक्त केले आहे.Joining hands with BJP, Congress leader ousted
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी भाजप विरोधात सतत संघर्ष करून लोकशाही- संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत असताना भाजपशी कुठलीही हात मिळवणी नको अशा प्रदेश काँग्रेसच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी उघड हात मिळवणी केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
ML/KA/PGB
4 May 2023