हजारो भारतीय VFX आर्टीस्टचा जॉब या कारणामुळे धोक्यात

मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हॉलिवूडमध्ये गेल्या १५५ दिवसांपासून लेखक आणि कलाकार मंडळींचा AI च्या वाढत्या वापराबाबत संप सुरू आहे. यामुळे भारतीय VFX आर्टीस्ट्सचे जॉब धोक्यात आले आहे. ६३ वर्षांतील सर्वात मोठ्या संपामुळे मोठे प्रोडक्शन हाऊस बंद झाल्याने १० हजारांपेक्षा जास्त व्हीएफएक्स आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स(सीजी) कलाकारांचे रोजगार संकटात आले आहेत. सुमारे २ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी, कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञांच्या या ऐतिहासिक संपामुळे अमेरिकी टीव्ही आणि चित्रपट उद्योग पूर्णपणे ठप्प झाला आहे. संपामुळे सुमारे ११ लाख कोटी रु.ची हॉलीवूड चित्रपट उद्योगातील काम ठप्प झाले आहे.
हॉलीवूडचे सर्व मोठे प्रोडक्शन हाऊस भारतीय वंशाच्या व्हीएफएक्स कलाकारांवर अवलंबून आहेत. ते आपले अनेक प्रकल्प भारतीय व्हीएफएक्स उद्योगाकडून आऊटसोर्सही करत आहेत. अँटी ग्रॅव्हिटी व स्क्रीन स्फोटांचे दृश्य भारतीय कलाकार मुंबई, बंगळुरू, हैदराबाद व चैन्नईत तयार करतात. संपामुळे अनेक अमेरिकी टीव्ही शोचे काम बंद झाले आहेत. यामध्ये एंडोर, स्ट्रेंजर थिंग्ज, द लास्ट ऑफ अस, येलो जॅकेट, द हँडमेड्स टेल, ब्लेड रनर २०९९चा समावेश आहे. भारतीय व्हीएफएक्स कलाकार व ॲनिमेटर्सची हॉलीवूडमध्ये खूप जास्त मागणी आहे. हॉलीवूडा व्हिज्युएल इफेक्टसाठी भारतीय प्रज्ञेला प्राधान्य दिले जात आहे. २०२२ मध्ये भारताच्या ॲनिमेशन उद्योगाने १०७८ कोटींचा महसूल गोळा केला. भारतात ९०० ॲनिमेशन, १२० व्हीएफएक्स व १८७ गेम डेव्हलपमेंटचे स्टुडिओ आहेत. त्यात सुमारे ४० हजार लोक काम करतात.
डम्बो मूव्हीचे व्हीएफएक्स कलाकार राहिलेले प्रांजल पंचसारा म्हणाले, अनेक प्रोडक्शन आऊसची कामे भारतीयांशिवाय चालत नाहीत. संपामुळे लहान कलाकारांना फटका बसला . भारतीय व्हीएफएक्स अार्टिस्ट कामासाठी युरोपीयन सिनेमा प्रोडक्शन हाऊसशी संपर्क साधत आहेत.
ॲव्हेंजर्स आणि थॉरसारख्या प्रोजेक्टवर काम करणारे हरसिमरतसिंग कौर म्हणाले की, भारतीयवंशाचे व्हीएफएक्स आर्टिस्ट आणि भारतीय व्हीएफएक्स उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. हजारो व्हीएफएक्स आणि ॲनिमेशन आर्टिस्टना ३ महिन्यांपासून काम मिळत नाही.
SL/KA/SL
31 Aug 2023