मुंबई पालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी

 मुंबई पालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्ही पदवीधर आहात आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. मुंबई पालिकेतील कोणत्या ना कोणत्या खात्यात नोकरी मिळावी ही प्रत्येक मुंबईकराची इच्छा असते. पण अनेकदा भरतीबद्दल उशीरा कळल्याने संधी निघून गेलेली असते. त्यामुळे आता आपण आगामी भरतीबद्दल जाणून घेऊया. मुंबई पालिकेच्या परवाना निरीक्षक अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. अनुज्ञापन निरीक्षक पदांची एकूण 118 रिक्त भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा तपशील देण्यात आला आहे. 

अनुज्ञापन निरीक्षक पदाच्या एकूण 118 जागा भरल्या जातील. यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. खुल्या गटातील उमेदवारांसाठी 38 तर मागासवर्गीय गटातील उमेदवारांसाठी  43 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात. उमेदवाराला संबंधित कामाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराला मराठीचे ज्ञान असावे. लेखी परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Job opportunities for graduates in Mumbai Municipality

ML/ML/PGB
21 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *