JSSC ने स्टेनोग्राफरच्या 454 पदांसाठी रिक्त जागा केल्या जाहीर
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : झारखंड कर्मचारी निवड आयोगाने झारखंड सचिवालयात स्टेनोग्राफरच्या ४५४ पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी इच्छुक असलेले उमेदवार jssc.nic.in या संकेतस्थळावर 5 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:
मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा संस्थेतून पदवी किंवा समकक्ष पदवी.
वयोमर्यादा:
21 ते 35 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि महिला उमेदवारांसाठी वयोमर्यादा शिथिल आहे.
शुल्क:
सामान्य श्रेणी – 100 रु
SC, ST- 50 रु
निवड प्रक्रिया:
कौशल्य चाचणी
लेखी परीक्षा
पगार:
पे मॅट्रिक्स लेव्हल- 4 नुसार, ते दरमहा रु. 25,500 ते रु. 81,100 पर्यंत असेल.
अर्ज प्रक्रिया:
jssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
Apply Online वर क्लिक करा.
नोंदणी करा आणि फी भरा.
फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या.
PGB/ML/PGB
10 Sep 2024